काव्यविषयाच्या नवजाणिवेच्या अनुषंगाने रेगे सर्वार्थाने नवकवी ठरतात, परंतु नवकाव्याच्या अग्रतेचा मान, नवकाव्याच्या प्रवर्तकतेचा मान रेग्यांना देता येणार नाही

नवकवितेचे प्रवर्तक मर्ढेकरच; रेगे हे नवकवी होय. कारण प्रवर्तकाला मागे तशी परंपरा निर्माण व्हावी लागते. मर्ढेकरांच्या तशी परंपरा निर्माण झाली. तशा पद्धतीने काव्यनिर्मितीची संवेदना मर्ढेकरांच्या कवितेने दिली. परंतु रेग्यांची कविता ‘निःसंग’ राहिली. रेग्यांची वृत्ती स्त्रीच्या लास्यसौंदर्यावर पुष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा केंद्र व काव्याचा परीघ स्त्रीकेंद्री राहिला.......